Rabdi Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरीच बनवा मलाईदार आणि स्वादिष्ट रबडी; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

1 लिटर फुल-फॅट दूध, 4-5 टेबलस्पून साखर, ½ टीस्पून वेलची पूड, काही केशराचे धागे (ऐच्छिक), बदाम, पिस्ते आणि काजूचे काप.

Rabdi Recipe | Saam tv

दूध आटवून घ्या

जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळा. नंतर मंद आचेवर सतत ढवळत आणि कडेला साय जमा करत दूध अर्ध्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा.

Rabdi Recipe | Saam Tv

साय परत दुधात मिसळा

भांड्याच्या कडेला लागलेली साय हलक्या हाताने खरवडून पुन्हा दुधात मिसळा. यामुळे रबडीला दाट आणि मलाईदार पोत मिळतो.

Rabdi Recipe | Saam tv

साखर आणि वेलची घाला

दूध पुरेसे आटल्यावर त्यात साखर, वेलची पूड आणि केशर घालून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.

Rabdi Recipe | Saam tv

ड्रायफ्रूट्स मिसळा

चिरलेले बदाम, पिस्ते आणि काजू घालून चांगले मिसळा. काही ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी बाजूला ठेवा.

Rabdi Recipe | Saam tv

थंड करून सर्व्ह करा

रबडी पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रिजमध्ये २ ते ३ तास ठेवा. थंडगार रबडीची चव अधिक छान लागते.

Rabdi Recipe | Saam tv

सर्व्ह करण्याची पद्धत

तयार रबडीवर केशर आणि ड्रायफ्रूट्सने सजावट करा. ही रबडी जलेबी, गुलाबजाम, मालपुआ किंवा फालुदासोबतही सर्व्ह करू शकता.

Rabdi Recipe | Saam Tv

Makeup Brush: मेकअप करताना कोणता ब्रश वापरायचा यामध्ये गोंधळ होतोय? जाणून घ्या ७ महत्त्वाचे मेकअप ब्रश

Makeup Brush | Saam Tv/AI
येथे क्लिक करा