Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

Shreya Maskar

दिल्ली

कुतुब मीनार हा दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे स्थित ७२.५ मीटर (२३८ फूट) उंच विजयस्तंभ आणि मिनार आहे.

Delhi | yandex

कुतुब मीनार

भारतातील इस्लामिक राजवटीच्या प्रारंभाचे प्रतीक म्हणून उभारलेला कुतुब मीनार हा युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळ आहे. तसेच जगातील सर्वात उंच विटांची मीनार आहे.

Qutub Minar | yandex

नावाचा इतिहास

कुतुब मीनारचे नाव १३ व्या शतकातील सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावावरून ठेवले गेले आहे, असे मानले जाते.

History of the name | yandex

कोणी बांधला?

कुतुब मीनारची निर्मिती दिल्ली सल्तनतचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक याने केली. कुतुब मीनार या वास्तूचे सौंदर्य जगात भारी आहे.

Who built it? | yandex

इतर नावे

कुतुब मीनारला सुरुवातीला 'कुव्वत-उल-इस्लाम मशिदीचा मिनार' म्हणून ओळखले जात असे आणि नंतर त्याला 'कुतुब साहब की लाट' असेही म्हटले जाऊ लागले.

other names | yandex

उंच विटांची मीनार

कुतुब मीनार बांधण्याचे काम ११९९ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने सुरू केले आणि त्याच्या उत्तराधिकार्यांनी ते पूर्ण केले. हा मनोरा मूळतः विजयस्तंभ आणि शेजारील कुव्वत-उल-इस्लाम मशिदीचा मिनार म्हणून बांधला गेला होता.

A tall brick tower | yandex

वास्तुकला

कुतुब मीनारमध्ये लाल आणि फिकट पिवळसर रंगाच्या वाळूच्या दगडांपासून बनवलेले पाच स्वतंत्र व वरच्या दिशेने निमुळते होत जाणारे मजले आहेत; प्रत्येक मजल्यावर बाहेरच्या बाजूला आलेली बाल्कनी असून त्यावर कुराणातील गुंतागुंतीच्या व कलात्मक अक्षरांमधील वचने कोरलेली आहेत.

Architecture | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | yandex

NEXT : आग्रा किल्ला हा 'लाल किल्ला' या नावाने का ओळखला जातो?

Agra Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...