Bharat Jadhav
"धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे", अशी वाक्ये तुम्ही नक्कीच वाचली किंवा ऐकली असतील. इतकेच नाही तर सिगारेटच्या पाकिटांवर ठळक अक्षरांमध्ये छापलेला हा संदेशही तुम्ही पाहिला असेल. तरीही, त्याकडे दुर्लक्ष करून लोक आवडीने सिगारेट ओढतात.
एक विशिष्ट तारीख ठरवा ज्यानंतर तुम्ही धूम्रपान करणार नाही. या निर्णयाबद्दल तुमचे कुटुंबीय किंवा मित्रांना कल्पना द्या, जेणेकरून ते तुम्हाला प्रोत्साहन देतील.
काही लोकांना चहा किंवा कॉफी पिताना, तणावात असताना किंवा मित्रांसोबत वेळ घालवताना धूम्रपान करण्याची तीव्र इच्छा होते. अशा गोष्टी ओळखा आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा होईल.
ज्यावेळी सिगारेट ओढण्याची इच्छा होईल त्यावेळी पाणी प्या, च्युइंगम चघळा किंवा थोडा वेळ चालायला जा.
दररोज हलका व्यायाम, योगासने किंवा वेगाने चालणे केल्याने तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. यासह एखादा नवीन छंद जोपासल्याने किंवा स्वतःला कामात गुंतवून ठेवल्याने धूम्रपानाची इच्छा रोखण्यास मदत होऊ शकते.
वारंवार प्रयत्न करूनही जर तुम्हाला धूम्रपान सोडता येत नसेल, तर डॉक्टर किंवा तंबाखू सोडण्यास मदत करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
'4-D' हे सूत्र सर्वात प्रभावी मानले जाते. जेव्हा जेव्हा व्यसनाची तीव्र इच्छा होईल, तेव्हा थोडा वेळ थांबा. कारण ती तीव्र इच्छा पाच मिनिटांत ओसरते. त्यावेळी खोल श्वास घ्या, पाणी प्या आणि दुसऱ्या एखाद्या कृतीवर लक्ष केंद्रित करून स्वतःचे लक्ष विचलित करावे.