Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Bharat Jadhav

प्रत्येकीला येत नाही ग्लो

डॉक्टरांच्या मते, शरीरात होणाऱ्या विविध नैसर्गिक बदलांमुळे असे घडत असते. तरीही, प्रत्येक महिलेला 'प्रेग्नन्सी ग्लो' अनुभवता येत नाही. गरोदरपणात प्रत्येक महिलेच्या शरीर वेगळ-वेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट करत असते.

Pregnancy Glow Explained

'प्रेग्नन्सी ग्लो'

'प्रेग्नन्सी ग्लो' म्हणजे अशी स्थिती इतर दिवसाच्या तुलनेत गरोदरपणात महिलेची त्वचा अधिक तेजस्वी, गुलाबी आणि टवटवीत दिसते. अनेक महिलांच्या गालांवर हलकीशी लाली येते.

Pregnancy Glow Explained

समस्या दूर होतात

हा बदल बऱ्याचदा गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत प्रकर्षाने दिसून येतो. या टप्प्यापर्यंत, सुरुवातीच्या काळातील थकवा, मळमळ (मॉर्निंग सिकनेस) आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या काही प्रमाणात कमी होऊ लागतात.

Pregnancy Glow Explained

वेगवेगळा अनुभव

काही स्त्रियांमध्ये हा 'ग्लो' संपूर्ण गर्भधारणेदरम्यान टिकून राहू शकतो, तर काहींमध्ये तो कदाचित अजिबात दिसून येत नाही.

Pregnancy Glow Explained

चेहरा टवटवीत का होतो?

गर्भावस्थेत शरीरातील इस्ट्रोजेन आणि hCG सारख्या हार्मोन्सची पातळी लक्षणीयरीत्या वाढते. या बदलांचा त्वचेवर परिणाम होतो आणि त्यामुळे अनेकदा चेहरा अधिक तेजस्वी दिसू लागतो.

Pregnancy Glow Explained

मुरुमेही येतात

गर्भावस्थेत होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे त्वचेतील तेल-ग्रंथी अधिक सक्रिय होतात. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येऊ शकते. मात्र काही स्त्रियांमध्ये या अतिरिक्त तेलामुळे मुरुमेही येऊ शकतात.

Pregnancy Glow Explained

गालावर गुलाबी रंग येतो

गर्भावस्थेत आई आणि बाळ या दोघांच्याही गरजा पूर्ण करण्यासाठी शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. रक्ताभिसरण वाढल्यामुळे त्वचेतील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, यामुळे गालांवर गुलाबी रंग येतो.

Pregnancy Glow Explained