Breakfast Recipe: एका ब्रेडपासून झटपट तयार करा 'हा' सोपा आणि स्वादिष्ट नाश्ता

Dhanshri Shintre

पौष्टिक नाश्ता

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यामुळे तो कधीही वगळू नका आणि नेहमी पौष्टिक नाश्ता करा.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

नवीन नाश्ता काय बनवावा?

कामाच्या गडबडीमुळे गृहिणींना रोज सकाळी नवीन नाश्ता काय बनवावा, हा प्रश्न अनेकदा समोर येतो.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

बेसन चीज टोस्ट

जर तुम्ही रोजचे नाश्ते करून कंटाळला असाल आणि काही वेगळं शोधत असाल, तर ‘बेसन चीज टोस्ट’ ट्राय करा.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

साहित्य

चमचा मीठ, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कांदा, शिमला मिरची, ब्रेड, हिरवी मिरची, कोथिंबीर, केचप, चटणी यांची आवश्यकता.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

कृती

बेसन चीज टोस्टसाठी एक भांड्यात बेसन, मीठ, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घ्या.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

भाज्या टाका

मिश्रण गुळगुळीत बनवून त्यात कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

ब्रेड बॅटरमध्ये घोळा

सर्व साहित्य एकत्र करून तव्यावर बटर किंवा तेल घालून, ब्रेड बॅटरमध्ये घोळवून तव्यावर ठेवा.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

तव्यावर शिजवून घ्या

ब्रेड स्लाइस शिजवून, एका स्लाइसवर चीज ठेऊन दुसरा स्लाइस ठेवून सँडविच करून, तव्यावर शिजवून घ्या.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

सर्व्ह करा

तयार बेसन चीज टोस्ट प्लेटमध्ये ठेवून, टोमॅटो केचपसह स्वादिष्टपणे सर्व्ह करा आणि आनंद घेवून खा.

Bread Cheese Toast Recipe | Freepik

NEXT: काहीच सुचत नसेल तर फक्त १० मिनिटांत तयार करा 'हा' नाश्ता, सोपी रेसिपी

येथे क्लिक करा