Dhanshri Shintre
सकाळच्या धावपळीत महिलांना झटपट, सोपी आणि चविष्ट नाश्त्याची गरज असते, त्यामुळे अशा रेसिपी नेहमीच उपयोगी ठरतात.
म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी धिरडे बनवण्याची खास रेसिपी घेऊन आलो आहोत, जरूर ट्राय करा.
किसलेला बटाटा, किसलेला कांदा, चिली फ्लेक्स, काळिमीरी पावडर, मीठ, जिरे, गव्हाचे पीठ, रवा, कोथिंबीर
धिरडे बनवण्यासाठी आधी बटाटा स्वच्छ धुवून सोला आणि तो त्वरित पाण्यात टाका, जेणेकरून तो काळा पडणार नाही.
कांद्याची साल काढून तो किसा आणि मग भांड्यात कांदा व बटाट्याचा किस एकत्र करून घ्या.
त्यात तीन चमचे गव्हाचे पीठ आणि कुरकुरीतपणासाठी एक चमचा रवा मिश्रणात जोडून चांगले एकत्र करा.
मिश्रणात अर्धा चमचा जिरे, एक चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.
धिरड्यांना सुंदर गोल आकार द्या. ओल्या कपड्यावर किंवा तेल लावलेल्या प्लास्टिकच्या पिशवीवर थापून तयार करू शकता.
सर्व साहित्य नीट मिसळा, नंतर तवा गरम करा. तवा तापल्यावर तयार मिश्रणाचे धिरडे टाकून शिजवायला सुरू करा. दोन्ही बाजूंना तेल लावून चांगले खमंग होईपर्यंत भाजत ठेवा.
तयार धिरडे प्लेटमध्ये काढून, दह्यासोबत सर्व्ह करा आणि चविष्ट नाश्त्याचा आनंद घ्या.