Sakshi Sunil Jadhav
दिवसभराच्या थकवणाऱ्या कामानंतर घरी आल्यानंतर चविष्ट आणि पोटभर जेवणाची इच्छा होते. मात्र स्वयंपाकघरात तासन्तास घालवायची इच्छा नसते. अशा वेळी या 30 मिनिटांत तयार होणाऱ्या डिनर रेसिपीज तुमच्यासाठी परफेक्ट ठरतील.
किसलेले पनीर, कांदा, टोमॅटो आणि साधे मसाले परतून पोळीमध्ये रोल करा. ही प्रोटीनयुक्त रेसिपी 10 मिनिटांत तयार होते.
भात, डाळ आणि भाज्या कुकरमध्ये शिजवून त्यात तूप आणि हलके मसाले घाला. पचायला सोपे आणि पोटभर जेवण तयार होईल.
मशरूम, लसूण, सोया सॉस, मिरी आणि स्प्रिंग ऑनियन परतून घ्या. टोस्ट किंवा भातासोबत हा हलका टेस्टी पर्याय ठरतो.
ओव्याचा स्वाद असलेला बेसन चिल्ला बनवून त्यात पटकन परतलेल्या भाज्या भरा. हिरव्या चटणीसोबत उत्तम डिनर.
उरलेला भात, मिक्स भाज्या, आले-लसूण आणि सॉस घालून झटपट स्टर फ्राय करा.
टोमॅटो आणि लसणाची झटपट सॉस तयार करून त्यात पास्ता, ऑलिव्ह ऑईल आणि बेसिल मिसळा. रेस्टॉरंट-स्टाईल डिनर घरीच बनवा.
या रेसिपीज कमी साहित्यांत आणि कमी वेळेत तयार होतात, त्यामुळे आठवड्यातील बिझी दिवसांसाठी उत्तम आहेत.