Saam Tv
तुम्हाला टिफीनमध्ये काहीतरी नवीन आणि चटपटीत डीश खायची असेल तर ही स्पेशल डीश तुमच्यासाठी.
पाव भाजीच्या गाडी वरचा चवदार असा तवा पुलाव तुम्ही घरी बनवू शकता. अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे.
शिजलेला भात, कांदा, टोमॅटो, लसणीच्या पाकळ्या, गाजर, शिमला मिरची, मटार, लाल मिरची पूड, पावभाजी मसाला, मीठ, तेल, घरचे लोणी, जिरे मोहरी इ.
सर्वप्रथम शिजलेला भात हाताने मोकळा करून घ्या. त्यात मिरची पावडर,पाव भाजी मसाला, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
कांदा, टोमॅटो, गाजर,शिमला मिरची , लसणाच्या पाकळ्या बारीक चिरुन घ्या.
आता पॅनमध्ये तेल आणि लोणी मिक्स करून तापवून घ्या. त्यात मोहरी जिरे लसणाच्या पाकळ्या, कांदे अॅड करुन परतून घ्या.
कांदे लसूण परतून झाल्यावर बाकीच्या भाज्या त्यात अॅड करा. मग चवीनुसार मीठ टाकून परतून घ्या.
नंतर टोमॅटो टाकून परता. टोमॅटो नरम झाल्यावर मिरची पावडर,पाव भाजी मसाला मीठ टाकून मिक्स करून पुलाव मिक्स करा. तयार आहे तुमचा तवा पुलाव.
NEXT :नदीच्या पाण्यात चेहरा पाहून चंद्र ही लाजेल