Tanvi Pol
हिरव्या मिरच्या धुऊन कोरड्या करून मध्ये चिरा द्या.
कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळद घाला.
मग त्यात मिरच्या टाका आणि २-३ मिनिटं परतून घ्या.
नंतर त्यात मीठ, थोडं जिरेपूड व धणेपूड घालून मिक्स करा.
हे मिश्रण थोडं गार झाल्यावर एका वाटीत काढा.
त्यावर २-३ चमचे घट्ट दही घाला आणि नीट मिसळा.
हवं असल्यास थोडंसं साखर घालून चव सांभाळा आणि तयार आहे ही मिरची भाकरी, पोळी किंवा वरणभातासोबत अप्रतिम लागते.