Saam Tv
सकाळ नेहमीच धावपळीची असते. विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांच्या कुटुंबांसाठी. दात घासणे, दप्तरे भरणे आणि हरवलेल्या गोष्टी शोधणे या सगळ्यात नाश्त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
नाश्ता केल्याने मुलांची एकाग्रता वाढते, ऊर्जा वाढते, अतिखाणे टळते, सकस नाश्त्यामुळे आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि यामुळे मुलांची चिडचिड, आळशीपणा कमी होतो.
पारंपरिक तसेच पौष्टिक नाश्ता आहे.गरम नॉन-स्टिक पॅनवर चमचाभर इडलीचे पीठ घाला, त्यावर बारीक चिरलेले गाजर, कांदे, टोमॅटो आणि सिमला मिरची पसरवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.कमीत कमी वेळात मऊ आणि पौष्टिक नाश्ता तयार
यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास आणि हाडांना मजबूत करण्यास मदत होईल . व्होल ग्रेन ब्रेडवर पीनट बटर लावून त्यावर पिकलेल्या केळ्याचे काप ठेवा. टोस्टर मध्ये ग्रिल करा ,तयार झाला मऊ, कुरकुरीत आणि पौष्टिक तसेच स्वादिष्ट पदार्थ.
मळलेल्या गव्हाच्या पीठात किसलेले चीज, उकडलेल्या मक्याचे दाणे, मसाले मिक्स करा. तव्यावर ते खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे मुलांना भरपूर
अंड्यामध्ये कांदा टोमॅटो बारीक चिरलेल्या भाज्या फेटून घ्या. सिलिकॉन मफिन्स कपमध्ये भरा. ओव्हन मध्ये बेक करा. यामुळे मुलांच्या स्नायूंचा विकास होतो भाज्या खायला कंटाळा करणाऱ्या मुलांसाठी मफिन्समध्ये पालक, गाजर, सिमला मिरची इ. लपवून घालता येतात.
ग्लासच्या तळाशी घट्ट दही घालून घाला.कारण .दह्यावर ग्रॅनोला, सुकामेवा किंवा बियांचा थर लावा त्यावर ब्लूबेरी,रास्पबेरी, हंगामी फळांचे काप ठेवा. असे थर एकावर एक ठेवावे, अधिक गोडव्यासाठी त्यावर मध किंवा मेपल सिरप घाला.
ब्रेडवर, चिरलेल्या भाज्या टोमॅटो, कांदे,मीठ, काळी मिरी,किसलेले चीज घाला . दुसरा ब्रेड त्यावर ठेवून सँडविच टोस्टरमध्ये टोस्ट करा. एक कुरकुरीत, चीझने भरलेला आणि भाज्यांनी परिपूर्ण टोस्टी, ज्यामुळे सकाळचा नाश्ता एखाद्या पौष्टीक होईल.