Siddhi Hande
उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे घरात अनेक आंब्याचे, कैरीचे पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली आहे.
कैरीचा आंबट-गोड मुरांबा हा सर्वांनाच खूप आवडतो. जेवताना तोंडी लावताना तुम्ही मुरांबा खाऊ शकता.
मुरांबा बनवण्यासाठी कच्चे आंबे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा. त्यानंतर सकाळी आंबे सोलून त्याचे तुकडे करा.
यानंतर एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा. त्यात आंब्याचे तुकडे टाका आणि थोडा वेळ शिजवा.
चाळणीतून हे पाणी आणि आंब्याचे तुकडे वेगळे काढा.
यानंतर साखरेची पाडवर बनवा. ही या आंब्याच्या तुकड्यांवर टाका. सर्व चांगलं मिक्स करुन घ्या.
कँडी पावडर पूर्ण विरघळल्यानंतर त्याला पॅनमध्ये ठेवा आणि शिजवा.
यानंतर वेलची आणि केशर टाका. हे मिश्रण थोड्या वेळा घट्ट होईल. हा मुरांबा तुम्ही काही दिवस साठवून खाऊ शकतात.