Shreya Maskar
उन्हाळ्यात घरीच इन्स्टंट उसाचा रस बनवा.
इन्स्टंट उसाचा रस बनवण्यासाठी ऊस, बर्फाचे तुकडे, साखर, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
इन्स्टंट उसाचा रस बनवण्यासाठी ऊस स्वच्छ धुवून त्याची साले काढून लहान तुकडे करून घ्यावेत.
मिक्सरला ऊसाचे तुकडे, बर्फाचे तुकडे, साखर, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने घालून रस काढून घ्यावा.
आता या मिश्रणात चिमूटभर काळे मीठ टाका.
उसाचा रस आता ग्लासमध्ये ओतून त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्स करा.
तयार उसाचा रस तुम्ही एक आठवडा फ्रिजमध्ये ठेवू शकता.
उसाच्या रसाची चव वाढवण्यासाठी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता.