Shreya Maskar
आंब्याची पोळी बनवण्यासाठी आंब्याचा रस, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
आंब्याची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम आंबे 1-2 तास पाण्यात भिजवून ठेवा.
त्यानंतर आंबा सोलून त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरला प्युरी करून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्या आंब्याची प्युरी टाका.
या मिश्रणात साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
मिश्रण घट्ट झाल की गॅस बंद करा.
आता ताटाला तूप लावून तयार मिश्रण छान पसरवून घ्या.
एक आठवडा हे ताट उन्हात वाळवायला ठेवा. गोड आंब्याची पोळी तयार झाली.