ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तपा हा एक अतिशय लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ मानला जातो. जो पचायला हलका, चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. उत्तपा विविध भाज्या वापरून बनवता येतो.
उत्तपा खाल्यावर पोट खूप काळासाठी पोट भरलेले राहते आणि त्यात असलेल्या भाज्यांमुळे शरिराला पोषण मिळते. लहान मुलेसुध्दा उत्तम चांगल्या आवडीने खातात.
रवा आणि दही मिक्स करुन मिनिटांमध्ये उत्तम तयार केला जातो. जाणून घ्या उत्तपा बनविण्याचा सोपे मार्ग.
रवा, दही, मीठ, कांदा, तेल, मिरची, कोथिंबीर, टॉमेटो आणि सोडा इ. साहित्य लागेल.
सर्वात आधी रव्यामध्ये दही मिक्स करा. त्यात स्वादानुसार मीठ आणि बेकिंग सोडा टाका. नंतर पानी मिक्स करुन जाड पेस्ट बनवून घ्या.
कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टॉमेटो यांना बारिक कापून घ्या. जास्त सुध्दा बारिक कापू नये.
या सर्व गोष्टींना रवा आणि दह्याच्या पेस्टमध्ये घालून ते मिश्रण मिक्सरमध्ये टाका आणि हलकेसे ग्राइंड करुन घ्या.
आता तवा गरम करुन घ्या. तवा गरम झाल्यावर त्यावर तूप किंवा तेल टाका.
आता उत्तपाचे पीठ तव्यावर गोल आकारात टाका. झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर उत्तपा शिजवून घ्या.
तयार झालेल्या उत्तपावर वरुन कांदा टाका आणि सर्व्ह करा. चटणी किंवा सांबर सोबत तुम्ही खाऊ शकता.