ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भेंडी हा एक लोकप्रिय भाजी आहे जी वेगवेगळ्या पध्दतीने बनवली जाते. यावेळेस आचारी भेंडी तुम्ही ट्राय करु शकता.
सामग्री- भेंडी, राईचे तेल, हींग, जीरे, बडीशेप, मेथीचे दाणे, मोहरी, हळद, बारीक चिरलेला कांदा,धणे पावडर
भेंडी धुवून सुकवा आणि त्याचे लहान तुकडे करा. तेल गरम करून हिंग आणि जिरे टाका.
बडीशेप, मेथी, मोहरी घालून परतून घ्या. नंतर भेंडी घाला आणि मध्यम आचेवर शिजवा.
हळद, धणे पावडर, मीठ आणि सुक्या आंब्याची पावडर घाला. भेंडी चांगले मिसळा आणि शिजवा.
भेंडी झाकून ठेवा आणि काही मिनिटे शिजू द्या जेणेकरून मसाले चांगले मिसळतील.
गॅस बंद करा आणि ताजी कोथिंबीर भाजीमध्ये मिसळवा. तुमची आचारी भेंडी तयार आहेत.
गरमगरम भाकरी किंवा पराठ्यासोबत वाढा आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्या.