Tanvi Pol
पहिल्यांदा एक वाटी गव्हाचं पीठ भिजवून १५ मिनिटं झाकून ठेवून द्या.
काही वेळाने पिठात थोडं तेल घालून पुन्हा मळून घ्या.
स्टफिंगसाठी वाफवलेली गाजरं, कोबी, कांदा, सिमला मिरची सर्व बारीक चिरून घ्यावे.
त्यात थोडं आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरपूड आणि सोया सॉस मिसळा.
पिठाचे छोटे पुरीसारखे गोळे लाटून त्यात स्टफिंग भरा.
किनाऱ्यांना फोल्ड करत मोमोजचा आकार द्या.
सर्व मोमोज १०-१५ मिनिटं स्टीमरमध्ये वाफवा आणि चिली सॉससोबत सर्व्ह करा.