ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेदू वडा हा पदार्थ नाश्त्यासाठी फार लोकप्रिय आहे.
मेदू वड्याची रेसिपी अगदी सोपी आहे.
भिजत ठेवलेली उडीद डाळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक नारळाचे तुकडे, हिरव्या मिरच्या, मीठ, तेल, इत्यादी
सर्व प्रथम भिजत घातलेल्या उडीद दाळीला मिक्सच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या. त्यानंतर हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्या.
बाउलमध्ये काढलेल्या बॅटरला थोडा वेळ ढवळून घ्या. यानंतर आवश्यकता असल्यास त्या बॅटरमध्ये पाणी अॅड करा.
आता या बॅटरमध्ये बारीक नारळाचे तुकडे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ अॅड करुन चांगले मिक्स करुन घ्या.
यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. मग त्यात तेल टाकून तेल गरम होऊ द्या.
तेल गरम झाल्यावर हाताला थोडेसे पाणी लावून हाताच्या साहाय्याने मेदू वड्याच्या पीठाचा गोळा तयार करा.
यानंतर त्या गोळ्याला मधोमध छिद्र करा आणि गरम तेलामध्ये सोडा.मेदू वड्याला दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
अशा प्रकारे गरमा गरम मेदू वडा तयार झाला आहे, मेदू वड्याला तुम्ही सांभार सोबत सर्व्ह करु शकता.
NEXT: कोजागिरी पौर्णिमेला करा 'या' पद्धतीने पुजा ; होईल एश्वर्यप्राप्ती