ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोजागिरी पौर्णिमा
अश्विन महिन्यातील १६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी अनेक भक्त सुख समृद्धीसाठी उपवास आणि देवी लक्ष्मीची पुजा करतात.
कोजागिरी पौर्णिमा १६ ऑक्टोबरला संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुरु होणार आहे. तर १७ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होणार आहे.
कोजागिरी सण मुख्यत: आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि ओडिसामध्ये साजरा केला जातो. तर उत्तर प्रदेशात कोजागिरीला 'शरद पौर्णिमा' असेही म्हणतात.
वास्तुशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
वास्तुशास्त्रानुसार कोजागिरीला तुम्ही पुजा करताना लाकडी फळीचा वापर करावा. त्यावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून पुजा करा.
हिंदू धर्मानुसार देवीच्या मुर्तीला लाल ओढणी , कुंकू , बांगड्या, हार, कमळाचे फुल या शृंगारांनी सजवले जाते.
वास्तुशास्त्रानुसार देवीला विविध फळे, मिठाई या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. सोबत तुम्ही इतर पदार्थांचा देखील समावेश करु शकता.
घराच्या दारात पौर्णिमेला रांगोळी काढू शकता. त्याने घरात सकारात्मकता जाणवेल. तसेच तुम्ही लक्ष्मी देवीचा जप करु शकता.
NEXT: यंदाची कोजागिरी पौर्णिमा होईल खास; घरच्याघरी बनवा मखाणा बासुंदी