ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सिंधी कढी हा एक लोकप्रिय पदार्थ आहे, ज्यामध्ये बेसन, भाज्या आणि आंबट चवीचे एक अनोखे मिश्रण असते.
बेसन, चिंचेचे पाणी, बटाटा, भेंडी, गाजर, मटार, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आले इ. साहित्य लागते.
नेहमीच सिंधी कढी करताना ताजे फ्रेश बेसन वापरावे. फ्रेश बेसन वापरल्यास कढीला चांगला स्वाद आणि सुगंध येतो.
कढीत चिंचेचे पाणी टाकाल्यास, कढीला एक आंबट गोड स्वाद येतो.
भाज्या चांगल्या प्रकारे परतून घ्या, जेणेकरून त्यांचा स्वाद कढीमध्ये चांगला मिसळून जाईल.
हिंग आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी द्या, यामुळे कढीला एक खास चव येते.
कढी कमी आचेवर शिजवा, जेणेकरून सर्व चवी चांगल्या प्रकारे मिसळतील.
शेवटी, कोथिंबीर आणि आल्याने सजवायला विसरू नका, यामुळे पदार्थाचा ताजेपणा आणि सुगंध वाढतो.