ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वांनाच बाहेरचे चमचमीत पदार्थ आवडत असतात.
आज तुम्हाला बटाटा भजी रेसिपी सांगणार आहोत.
बटाटे,बेसन, लाल तिखट,हळद,मीठ,ओवा,जिरेपूड,धणेपूड,कोथिंबीर,हिंग,खाण्याचा सोडा,पाणी,तेल इत्यादी
सर्व प्रथम बटाटे स्वच्छ धुवून त्यांची साले काढून घ्या. त्यानंतर त्याचे पातळ काप करुन थोडावेळ पाण्यात ठेवा.
एक बाऊल घ्या. त्यामधे बेसनाचे पीठ जिरेपूड,धणेपूड,लाल तिखट,हळद,हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अॅड करा. यानंतर या मिश्रणात खाण्याचा सोडा,ओवा आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
यानंतर या मिश्रणात खाण्याचा सोडा,ओवा आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. नंतर बटाट्याच्या कापाना पाण्यातून काढून एका ताटात ठेवा.
यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. मग त्यात तेल टाकून तेल गरम होऊ दया.
गरम झालेल्या तेलामध्ये बटाट्याच्या कापला बेसनाच्या पिठात बुडवून गरम तेलात सोडा.
बटाटा भजीला मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
अशा प्रकारे आपली गरमागरम बटाटा भजी तयार झाली आहे.
NEXT: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो