ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑक्टोबर हीट सुरु झाली या दिवसात आपण जास्त उष्ण पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
रोजचा ठरलेला आहार खावून कंटाळतो. मग आपण बाहेरचे पदार्थ खायला सुरुवात करतो.
बाहेरचे पदार्थ खावून आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. चला तर थंड आणि पौष्टीक असा आहार आपण १५ मिनीटांत तयार करु.
सर्वप्रथम तुम्ही तांदुळ स्वच्छ धुवून त्याचा मोकळा भात तयार करुन घ्या.
तयार भात तुम्ही पुर्ण थंड करुन घ्या. त्याशिवाय आपली रेसिपी तयार होवू शकत नाही.
आता थंड भात एका प्लेटमध्ये टाकून मोकळा करुन घ्या. पुढे तुम्ही फोडणीची तयारी करायला घ्या.
त्या आधी भातात दही, दुध व मीठ टाकून मिक्स करा. आता गॅसवर कढई ठेवा.
कढईत दोन चमचे तेल घाला. ते गरम झाल्यावर जिरे- मोहरी , हिंग, आलं ,हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या.
फोडणीत शेवटी उडीद डाळ घालून परतून अर्धा मिनीट परतून घ्या. याने डिशला उत्तम फ्लेवर येईल.
आता फोडणी दही भातावर घालून डिश सर्व करा. कर्ड राईससोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी खावू शकता.शेवटी राईसवर कोथिंबीरने गार्निशींग करून मस्त इंजॉय करा.
NEXT: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?