ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाटे, तेल , मोहरी, जीरे, हळद मीठ लाल मिरची, धने पावडर आणि कोथिंबीर
सर्वप्रथम बटाटे उकडवून घ्या.
एक पॅनमध्ये तेल गरम करा.
नंतर यामध्ये मोहरी आणि जिरे घाला आणि ते तडतडायला लागले की हळद, तिखट आणि धणे पावडर घाला.
आता, यामध्ये उकडलेले बटाटे घाला आणि चांगले मिक्स करुन घ्या.
भाजीला मंद आचेवर शिजवा. शेवटी यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. आणि मंद आचेवर शिजवा.
कोथिंबीरने सजवा. गरमागरम बटाट्याची भाजी सर्व्ह करा.