ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नाशिक शहरात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. सुंदर धबधब्यांपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत तुम्ही येथे अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.
नाशिकपासून माळशेज घाट 73 किलोमीटर अंतरावर आहे. येथील हिरवेगार डोंगर अन ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
माळशेज धबधबा खूप प्रसिद्ध आहे. शांत वातावरण आणि सुंदरतेचे योग्य संगम म्हणजे माळशेज धबधबा.
माळशेज घाटापासून १८ किलोमीटर अंतरावर पिंपळगाव जोगा डॅम आहे. पुष्पावती नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. येथे नक्की भेट द्या.
हरिश्चंद्रगड किल्ल्यावर तुम्ही ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. ४६६५ फूट उंचीवर असलेला हरिश्चंद्रगड किल्ला हा माळशेज घाटातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे.
आजोबा टेकडी किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगातील सर्वात उंच शिखरांपैकी एकावर वसलेला किल्ला आहे.
जर तुम्ही साहसी प्रेमी असाल तर कोकण कडा हे माळशेज घाटातील भेट देण्यासारख्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.