ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई एक कर्तव्यदक्ष आणि कुशल राजकारणी होत्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात त्या वाघिणीसारख्या लढल्या.
महाराणी येसूबाई यांनी १६८० ते १७३० या काळात स्वराज्यासाठी खूप महत्वाचे योगदान दिलं.
पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घरात महाराणी येसूबाई यांचा जन्म झाला.
इतिहासकारांच्या मते, इसवी सन १६६१ ते १६६५ या दरम्यान महाराणी येसूबाईचा विवाह छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत झाला. अंदाजे वयाच्या ६ ते ७ व्या वर्षी त्यांच लग्न झाल्याचं म्हटलं जातं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थित महाराणी येसूबाई यांनी मुत्सद्दीपणा दाखवत स्वराज्याची धुरा सांभाळली.
१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून येसूबाईंनी त्यांना रायगड सोडून जाण्यास सांगितले.
महाराणी येसूबाई यांनी स्वत: रायगड लढवली परंतु मुघलांनी त्यांना कैद केलं. २७ वर्षांहून अधिक काळ त्या कैदेत होत्या.
इतिहासातल्या नोंदीनुसार, ४ जुलै १७१९ रोजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर त्यांच साताऱ्यात आगमन झालं.