Manasvi Choudhary
ऑनलाईन पेमेंट ही आजकाल काळाची गरज बनली आहे. हल्ली सर्वजण ऑनलाईन पेमेंट करतात.
दुकान, मॉल, मेडिकल किंवा कुठे प्रवास करायचा असेल तर आपण ऑनलाईन म्हणजेच QR कोर्ड स्कॅन करून पेमेंट करतो.
पंरतु, तुम्हाला माहितीये का? QR कोडवर पेमेंट करताना काही चुका केल्यास तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते.
ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्या व्यक्तीचा QR कोड स्कॅन करा. जर तुम्ही कोणीतरी पाठवलेला QR कोड स्कॅन करून पिन टाकला, तर तुमच्या अकाउंटमधील पैसे समोरच्याच्या खात्यात जातील.
बऱ्याचदा दुकानांमध्ये लावलेल्या मूळ QR कोड स्टिकरवर सायबर चोरटे त्यांचे स्वतःचे फेक स्कॅनर स्टिकर चिकटवून ठेवत असतात. त्यामुळे पेमेंट करताना नेहमी दुकानदाराचे नाव त्या स्कॅनरवर किंवा पेमेंट ॲपच्या स्क्रीनवर अचूक दिसते का, याची खात्री करा.
ऑनलाइन पेमेंट करताना योग्य व्यक्तीच्या नावाचे QR कोर्ड आहे की नाही याची खात्री करा नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.
पैसे पाठवताना नेहमी पिन टाकावा लागतो, परंतु पैसे स्वीकारताना कधीही यूपीआय पिन टाकावा लागत नाही. जर कोणी तुम्हाला पैसे पाठवण्याच्या बहाण्याने यूपीआय पिन टाकण्यास सांगत असेल, तर सावध व्हा नाहीतर तुमचे अकाउंट खाली होऊ शकते.
QR कोर्ड स्कॅन केल्यानंतर पैसे पाठवण्याआधी योग्य खात्री करा. जर चुकूनही चुकीच्या ट्रान्झॅक्शनची किंवा फसवणुकीची शंका आली, तर बँक अकाउंट तात्पुरते ब्लॉक करा.