Manasvi Choudhary
पोटात जंत होणे ही सामान्य समस्या आहे. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष केले तर पोटासंबंधित विविध त्रास उद्भवतात.
पोटात जंत झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडू शकते. वारंवार पोट दुखणे, जुलाब होणे, शौचातून जंत पडणे, रात्री झोपेत लाळ गळणे आणि भूक न लागणे ही मुख्य लक्षणे दिसतात.
केवळ गोळ्या- औषधं नाही तर तुम्ही घरगुती आयुर्वेदिक उपाय केल्याने पोटातील जंत कमी होण्यास मदत होईल.
एक ग्लास ताकामध्ये चिमूटभर ओव्याची पावडर मिक्स करून तुम्ही हे प्या.
३ ते ४ दिवस नियमितपणे सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवणानंतर हे ड्रिंक प्यायल्याने पोटातील जंत कमी होण्यास मदत होते.
ताकात ओवा मिसळून प्यायल्याने पोटातील जंत कमी होण्यास आणि नष्ट होण्यास मोठी मदत होते.
या उपायामुळे जंतांमुळे होणारे पोट दुखणे आणि वारंवार होणाऱ्या जुलाबाच्या त्रासापासून आराम मिळतो.
ताकामध्ये ओव्याची पावडर मिक्स करून प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच भूक देखील लागते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.