Manasvi Choudhary
होळी या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
होळी हा सण पुरणपोळी शिवाय साजरा होतच नाही.
घरी पुरणपोळी बनवण्याची सोपी पद्धत आहे.
पुरणपोळी बनवण्यासाठी चण्याची डाळ, मैदा, तेल, मीठ, साजूक तूप, गूळ, साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम चण्याची डाळ स्वच्छ धुवून 3/4 तास भिजत घाला.
नंतर गॅसवर कुकरमध्ये साधारण तिप्पट पाणी घालून चण्याची डाळ शिजवा.
डाळ शिजल्यानंतर किसलेला गूळ आणि साखर यामध्ये घाला.
नंतर संपूर्ण मिश्रणात वेलची आणि जायफळ पावडर घालून पुरणाच्या भांड्याने मिक्स करा.
मैदामध्ये मीठ आणि पाणी घालून नीट मळून घ्या.
यानंतर पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण घालून पुरणाच्या पोळ्या पातळ लाटून घ्या.
गॅसवर गरम तव्यावर पुरणाची पोळी साजूक तूप लावून भाजून घ्या.
अशाप्रकारे मऊसुत पुरणाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत.