Ruchika Jadhav
मिसळ म्हटलं की, सर्वच खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. नाश्तामध्ये अनेक व्यक्ती मिसळवर ताव मारतात.
पुण्यात मिळणारी झणझणीत मिसळ चाखण्यासाठी अनेख खवय्ये अशा मिसळीच्या स्टॉलच्या शोधात असतात.
आता घरच्या घरी मिसळ बनवायची असेल तर आधी कडधान्यांपासून बनलेली रस्सा भाजी बनवून घ्या.
तरी असलेला रस्सा बनवताना शक्यतो भरपूर मोड आलेले कडधान्य वापरा.
ही भाजी बनवताना त्यामध्ये सुरुवातीलाच जास्त तेल टाका.
त्यानंतर यामध्ये फरसाण मिक्स करा. अनेक व्यक्तींना कुरमुरे चिवडा, किंवा डाळी आवडतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फरसाण निवडू शकता.
पुणेरी मिसळ बनवायची असेल तर तुम्ही शक्यतो बेसण पीठापासून बनलेलं फरसाण वापरा.
तरी असलेला रस्सा आणि त्यावर फरसाण तसेच कांदा, लिंबू आणि पावांसह तयार झाली पुणेरी मिसळ