Shraddha Thik
सिंहगड हा किल्ला पुण्यातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. हे पुण्यातील अनेक पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
सिंहगड किल्ला पुणेपासून जवळजवळ 30 किलोमीटर दूर आहे.
सिंहगडाची स्थापना ही साधारण 2000 वर्षांपूर्वी झाली आहे असे म्हटले जाते. हा समुद्रसपाटीपासून 4400 फुट उंच आहे.
सिंहगड किल्ला हा मराठा साम्राज्याची शान म्हणून ओळखला जातो.
हा किल्ला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता.
या किल्ल्यावर अनेक लढाया झाल्या, त्यापैकी 1670 मधील तान्हाजी मालुसरेंनी सिंहगड काबीज करण्यासाठी केलेली लढाई फारच थरारक होती.
1670 च्या लढाईनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले. हा किल्ला शूर सेनापती तानाजी मालुसरे यांना समर्पित आहे.