Shreya Maskar
पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर मोरगिरी किल्ला हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही येथे वीकेंडला ट्रिप प्लान करा.
मोरगिरी किल्ला हा पुण्यातील लोणावळ्याजवळील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला एक भन्नाट ट्रेकिंग स्पॉट आहे.मोरगिरी किल्ला लोणावळा रेल्वे स्थानकापासून सुमारे १८ किमी अंतरावर आहे.
सुमारे ३,०१० फूट उंचीवर वसलेला मोरगिरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महत्त्वपूर्ण टेहळणी चौकीच्या रूपात वापरला होता. प्राचीन उंबरखिंड व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्यावरून पवना आणि मुळशी खोऱ्यांवर लक्ष ठेवले जात असे.
मोरगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी जांभुळणे या पायथ्याच्या गावापासून ट्रेक सुरू होतो. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर लोखंडी शिड्यांचा वापर करून ट्रेक करावा लागतो. येथून पवना आणि मुळशी खोऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
मुंबईहून लोणावळ्यापर्यंत ट्रेनने प्रवास करा. तेथून रिक्षाने किंवा बसने जांभुळणे गावाजवळ जा. जंगल आणि खडकाळ वाटेवरून येथे ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.
मोरगिरी किल्ल्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणी आहे. खडकाळ असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर एक अतिशय लहान आणि अरुंद पठार असून त्याच्या कडांवरून खोल दऱ्या आहेत.
पुण्यात ट्रेकिंगसाठी लोहगड किल्ला ट्रेक, सिंहगड किल्ला, कोरीगड किल्ला, तोरणा किल्ला आणि हरिश्चंद्रगड हे भन्नाट स्पॉट्स आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.