Shreya Maskar
सुधागड किल्ला ज्याला 'भोरपगड' असेही म्हणतात. हा रायगड जिल्ह्यात वसलेला डोंगरावरील किल्ला आहे. सुधागड किल्ला समुद्रसपाटीपासून ६२० मीटर (२,०३० फूट) उंचीवर असून पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला आहे.
सुधागड किल्ला सोपा ट्रेकिंग स्पॉट आहे. मुंबईपासून सुमारे ११५ किमी अंतरावर आहे. ठाकूरवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
किल्ल्याच्या वाटेवर हिरवीगार वनराई, दोन तलाव असलेले पठार, भोराई देवीचे मंदिर आणि सरसगड व तेल-बैला यांचे विहंगम दृश्य अनुभवता येते.
१६५७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून 'सुधागड' असे केले. साम्राज्याची राजधानी म्हणून त्यांनी सुरुवातीला या किल्ल्याचा विचार केला होता, परंतु नंतर अधिक मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रायगडची निवड केली.
सुधागड किल्ला मूळतः ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बांधला गेला होता. व्यापारी हालचालींच्या संरक्षणासाठी त्याची उभारणी करण्यात आली असावी.
सुधागड किल्ल्याच्या जवळ खोपोली स्टेशन आहे. खोपोली स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाशी जाऊ शकता.
सुधागड किल्ल्यावर रायगडच्या महादरवाजासारखाच भव्य महादरवाजा, पंत सचिवांच्या वाड्याचे अवशेष आणि नैसर्गिक तलाव, दगडी कोठारे असलेले एक विशाल पठार पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.