Shreya Maskar
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात, लोणावळ्याजवळ मोरगिरी किल्ला वसलेला आहे. हा डोंगरी किल्ला आहे. वीकेंडला येथे नक्की फिरायला जा.
मोरगिरी किल्ला १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेल्याचे मानले जाते. किल्ल्याच्या माथ्यावरील मर्यादित जागा आणि टेहळणीसाठी असलेली मोक्याची स्थिती पाहता हा किल्ला मावळ भागातील परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी एक लष्करी टेहळणी चौकी म्हणून प्रामुख्याने वापरला जात असे.
मोरगिरी किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,०१० ते ३,५४० फूट उंचीवर वसलेला आहे. निसर्गरम्य पठार, दाट जंगल, खडकाळ टप्पा आणि शिखरापर्यंत जाण्यासाठीची लोखंडी शिडी यांचा समावेश आहे.
मोरगिरी किल्ला आकाराने त्रिकोणी असूनयाचे लहान व टोकदार शिखर आणि उंचावरील स्थान यामुळे याचा वापर प्रामुख्याने लष्करी टेहळणी बुरूज म्हणून केला जात असे. मोरगिरी किल्ल्याजवळ तुंग आणि तिकोना हे किल्ले देखील आहेत.
मोरगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी मोरावे आणि जांभुळणे ही मुख्य गावे आहेत, जी पवना आणि मुळशी खोऱ्यांच्या जवळ वसलेली आहेत. तुम्ही पुणे स्टेशनवरून या गावासाठी रिक्षा पकडा आणि गावाला पोहचल्यावर किल्ल्यापर्यंत ट्रेकिंग करा.
खडकाळ वाट, दाट वनराई आणि सरळ उभी खडकाळ भिंत चढण्यासाठी असलेली लोखंडी शिडी ही याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्याच्या लहानशा शिखरावरून पवना आणि मुळशी जलाशयांचे तसेच आसपासच्या शिखरांचे विहंगम दृश्य दिसते.
'मावळचा टेहळणी बुरूज' म्हणून मोर्गिरी किल्ला ओळखला जातो. पावसाळ्यात किल्ल्याचे सौंदर्य आणखी खुलते. सुंदर धुक्याची चादर पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क