Shreya Maskar
पिंपरी-चिंचवड (PCMC) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेले एक प्रमुख औद्योगिक आणि निवासी जुळे शहर आहे. येथे तुम्ही वीकेंडला फिरायला नक्की जाऊ शकता.
चाकण किल्ला ऐतिहासिक वारसा जपतोय. चाकण किल्ला हा संग्रामदुर्ग म्हणूनही ओळखला जातो.
तळेगाव परिसर इंदुरी किल्ला वसलेला आहे. कमी गर्दीच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची आवड असेल तर हे ठिकाण नक्की फिरा.
लोणावळा परिसरात लोहगड किल्ला आहे. पिंपरी-चिंचवडपासून रस्त्याने साधारण ४८ किमी अंतरावर वसलेला आहे. प्रसिद्ध विंचूकाटा, ऐतिहासिक दरवाजे आणि सुंदर सह्याद्रीचे दृश्य हे प्रमुख आकर्षण आहे.
पिंपरी-चिंचवड येथील चिखली येथे जाधव किल्ला वसलेला आहे. ३०० वर्षांहून अधिक जुन्या या किल्ल्याचे रूपांतर आता अलिशान हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.
पवन मावळ येथे तिकोना किल्ला वसलेला आहे. हा त्रिकोणी आकाराचा डोंगरी किल्ला असून ट्रेकिंग आणि पवना धरणाच्या परिसरातील निसर्गदृश्यांसाठी लोकप्रिय आहे. पिंपरी-चिंचवडपासून रस्त्याने साधारण ५०–५५ किमी अंतरावर आहे.
मळवली येथे विसापूर किल्ला आहे. विस्तीर्ण पठार, किल्ल्याचे अवशेष आणि साहसी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात मार्ग निसरडा होतो, त्यामुळे येथे जाताना विशेष खबरदारी घ्यावी.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.