१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

Bharat Jadhav

मराठ्यांचं नव्हतं राज्य

हा आधी आदिलशाहीच्या विजापूरचे सुलतान यांच्या ताब्यात होता. याआधी तो मुघल आणि निजामशाही यांच्याही अधिपत्याखाली होता. परंतु जेव्हा आदिलशाहीच्या ताब्यात होता त्यावेळी दादाजी कोंडदेव हे या किल्ल्याचे सुभेदार होते.

आधी काय होतं नाव

आदिलशाहीच्या ताब्यात असताना या किल्ल्याचे नाव कोंढाणा होतं. कोंढाणा हे नाव कशावरून पडलं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचे उत्तर एका आख्यायिकेत मिळते. दंतकथेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली. म्हणून कोंढाणा नाव झाल

गडावर शंकराचे मंदिर

गडावर कोंढाणेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

रणनीती आणि वास्तुकला

हा किल्ला नैसर्गिकरीत्या अतिशय उंच आणि अवघड अशा खडकाळ कड्यांवर वसलेला आहे. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी मुख्यत्वे दोन दरवाजे आहेत.

ऐतिहासिक लढाईनं बदलला इतिहास

४ फेब्रुवारी १६७० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मालुसरे आणि मुघलांचे किल्लेदार उदयभान राठोड यांच्यात झालेल्या लढाईन किल्ल्याचा इतिहास बदलला.

पुरंदरच्या तहात गमावला होता किल्ला

पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना कोंढाणासह २३ किल्ले मुगलांना द्यावे लागले होते. हा किल्ला परत मिळवणे स्वराज्यासाठी अत्यंत गरजेचे होतं.

४ फेब्रुवारी १६७० झाली लढाई

शिवाजी महाराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याची मोहीम स्वीकारली. त्यांनी आपल्या मावळ्यांसह ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री कोंढाण्यावर चढाई केली.

किल्ल्याचं नाव बदललं

मराठे आणि मुघलांमध्ये भीषण युद्ध झालं. एकट्या तानाजींनी उदयभानशी निकराची झुंज दिली. या लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. तानाजींच्या बलिदानाच्या स्मरणार्थ महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' ठेवले.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Devgiri Fort: ७५० पायऱ्या अन् मगरींचा पहारा; महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे हा किल्ला