Devgiri Fort: ७५० पायऱ्या अन् मगरींचा पहारा; महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे हा किल्ला

Bharat Jadhav

युद्धकौशल्य आणि रणनीतीचा प्रतीक

दख्खन पठाराच्या उंच शिखरावर दिमाखात उभा असलेला दौलताबाद किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार. आधी देवगिरी म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला युद्धकौशल्य आणि रणनीतीच्या अद्वितीयतेचं प्रतीक आहे.

यादव साम्राज्याची राजधानी

यादव राजवंशातील भिल्लम पाचव्यानं १२व्या शतकात हा अभेद्य किल्ला बांधला. मजबूत तटबंदी आणि व्यापारी मार्गांवरील नियंत्रणामुळे हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी बनला.

चांद मीनार

जमिनीवरून निरीक्षण करण्यासाठी बहामनी राजवटीत १४३५ मध्ये बांधण्यात आलेला हा भव्य मनोरा ६३ मीटर उंच आहे.

पर्यटकांसाठी खास अनुभव

येथील निसर्गसौंदर्य पाहून प्रत्येक पाऊल सार्थ वाटतं असतं. दौलताबाद हा केवळ एक किल्ला नाहीतर इतिहास, रोमांच आणि शौर्याचं एक अद्वितीय प्रतीक आहे. येथील सफर हा इतिहासप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.

किल्ल्याची अभेद्य रचना

शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी किल्ल्यावर 'अंधार कोठडी' नावाचा गुंतागुंतीचा आणि चक्रव्यूहासारखा मार्ग बनवला होता. यातून मार्ग काढणे अशक्य होते.

खंदक आणि मगरी

किल्ल्याच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी खोल खंदक खोदलेले आहेत. त्यात तत्कालीन काळात मगरी सोडल्या जात असायच्या असं सांगितलं जातं.

खडकातून कोरलेला मार्ग

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार. किल्ल्याला एकच प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी खडकातून कोरलेला एक मार्ग आहे. तोही अरुंद आणि वळणदार आहे.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Lohagad Fort: लोहगडचा रहस्यमय किल्ला कधी आणि कोणी बांधला? जाणून घ्या इतिहास