Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Sakshi Sunil Jadhav

पुणे शहर

पुणे हे शहर सगळ्यांच्या आवडीचं आणि सगळ्यात जवळचं ठिकाण मानलं जातं. इथे तुम्ही उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळ्यातही फिरायला जाऊ शकता.

cool places near Pune

लोणावळा 65 किमी

पुण्यापासून सर्वात जवळचं आणि प्रसिद्ध हिल स्टेशन हे लोणावळा आहे. इथे पावसाळ्यात धबधबे आणि धुकं यामुळे निसर्गाचं सौंदर्य खुललेलं दिसतं.

Lonavala travel

खंडाळा 70 किमी

शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण, कपल्स आणि फॅमिलीसाठी बेस्ट आहे. सुंदर व्हॅली व्ह्यू आणि थंड हवेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Khandala hill station

महाबळेश्वर 120 किमी

स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेलं हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर. थंड हवामान, पॉइंट्स आणि बोटिंगसाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Mahabaleshwar trip

पंचगणी 100 किमी

टेबल लँड आणि सुंदर व्हॅलीसाठी पंचगणी ओळखलं जातं. शांत वातावरण आणि कमी गर्दीची रिलॅक्स ट्रिप करायची असेल तर हे बेस्ट ठिकाण आहे.

Panchgani tourism

माथेरान 120 किमी

वाहनमुक्त हिल स्टेशन, स्वच्छ हवा आणि निसर्ग अनुभवण्यासाठी तुम्ही माथेरानला फिरायला जाऊ शकता. ट्रेकिंग आणि टॉय ट्रेन सुंदर आहे.

Matheran travel guide

भंडारदरा 160 किमी

धरण, तलाव आणि धबधब्यांसाठी भंडारदरा खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. कॅम्पिंग आणि स्टार गॅझिंगचा तुम्हाला इथे अनुभव घेता येईल.

Bhandardara camping

ताम्हिणी घाट 50 किमी

पावसाळ्यातली हिरवळ आणि धबधब्यांनी नटलेला घाट पाहायचा असेल तर ताम्हिणी घाट बेस्ट आहे.

Tamhini Ghat

लवासा 60 किमी

इटालियन स्टाईल टाउनशिप, लेकसाईड व्ह्यू आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी हे ठिकाण छान आहे.

Lavasa tourism

NEXT: गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Papad Bhaji Recipe | google
येथे क्लिक करा