Pune Tourism : शनिवार-रविवार काय करताय? पाहा तळेगावाजवळील 'हा' सीक्रेट पिकनिक स्पॉट

Shreya Maskar

पावसाळा

मुंबईत पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस येताच आपण पिकनिकचे प्लान करतो. तुम्ही देखील येणाऱ्या वीकेंडला मुंबई-पुण्याजवळ ट्रिप प्लान करत असाल तर कुंडमाला धबधबा हे बेस्ट लोकेशन आहे.

Monsoon | google

कुंडमाला धबधबा

कुंडमाळा धबधब्याला बेगडेवाडी धबधबा असेही म्हणतात. हा धबधबा पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेजवळील बेगडेवाडी येथे इंद्रायणी नदीवर वसलेला आहे.

Kundmala Waterfall | google

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात येथील सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता. तसेच पावसाळ्यात येथे धुक्याची चादर आणि इंद्रधनुष्य पाहायला मिळते.

Natural Beauty | google

वैशिष्ट्ये

नदीच्या प्रवाहामुळे पात्रातील खडकांमध्ये विचित्र, पोकळ आकार आणि डोह नैसर्गिकरीत्या तयार झाले आहेत. पावसाळ्यातील दाट हिरवळ पाहायला मिळते.

Features | google

खळखळणारे पाणी

उंचावरून थेट खाली पडणाऱ्या धबधब्याऐवजी, येथे पाणी बांध आणि खडकाळ थरांवरून अतिशय सुंदररीत्या खाली वाहते.

Rushing Waters | google

मंदिर

कुंडमाला धबधब्याजवळ 'कुंदराई माता' यांचे मंदिर आहे. ही अनेक लोकांची स्थानिक कुलदेवता असून त्यांची मनोभावे पूजा केली जाते.

Temple | google

कसं जाल?

तुम्ही मुंबईहून पुण्यात ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर पुण्याहून तळेगावपर्यंत बस किंवा रिक्षाने जा. पुढे तुम्ही चालत कुंडमाला धबधब्यापर्यंत पोहचाल.

How to Reach? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

kalsubai peak | SAAM TV
येथे क्लिक करा...