kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Shreya Maskar

कळसूबाई शिखर

कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून ते अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदराजवळ आहे. कळसूबाई शिखराची उंची ५,४०० फूट आहे. येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.

kalsubai peak | pinterest

कळसूबाई शिखर ट्रेकिंग

कळसूबाई शिखर चढण्यासाठी ट्रेकिंगची सुरूवात शिखराच्या पायथ्याशी असलेल्या 'बारी' या गावापासून होते. जे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून साधारणपणे १५० किमी अंतरावर आहे. शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे २.५ ते ४ तास लागतात.

Kalsubai Peak Trekking | google

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट

कळसूबाई शिखर समुद्रसपाटीपासून १,६४६ मीटर (५,४०० फूट) उंच आहे. याला 'महाराष्ट्राचे एव्हरेस्ट' असेही म्हणतात.

Everest of Maharashtra | pinterest

कळसूबाई नाव कसं पडलं?

कळसू ही 'बारी' भागातील एक दयाळू गावकरी तरुणी होती. तिला औषधी वनस्पतींचे ज्ञान होते. ती गावकरी आणि गावांतील प्राण्यांवर उपचार करायची.

How did you get the name Kalsubai? | google

कळसूची दंतकथा

स्थानिक लोककथेनुसार, कळसू नावाच्या एका तरुणी वरून या शिखराचे नाव कळसूबाई ठेवण्यात आले. कळसू एका कोळी कुटुंबाकडे काम करत होती. तिची अट अशी होती की, तिला भांडी घासणे किंवा फरशी पुसणे यांसारखी कामे सांगू नये. मात्र जेव्हा तिला अखेरीस ही कामे करण्यास भाग पाडले गेले, तेव्हा तिने ती कामे पूर्ण केली आणि शिखरावर चढाई केली, पण ती पुन्हा कधीच परतली नाही.

Kalsu | pinterest

कळसूबाई मंदिर

तेथील स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, ती कळसू नावाची मुलगी, पर्वताशी एकरूप झाली. तिचा सन्मान करण्यासाठी त्यांनी पर्वताच्या उतारावरील तिच्या मूळ निवासस्थानी एक छोटेसे मंदिर आणि अगदी शिखरावर 'कळसूबाई मंदिर' उभारले. आज तिची स्थानिक आदिवासी देवता (कळसू आई) म्हणून अत्यंत श्रद्धापूर्वक पूजा केली जाते.

Kalsubai Temple | pinterest

तीन बहिणी

कळसूबाई शिखराचे नाव प्रादेशिक भौगोलिक दंतकथेनुसार, तीन बहि‍णींशी जोडले आहे. ज्यांची नावे कळसूबाई, रत्नाबाई आणि कटराबाई अशी सांगतात. जवळच असलेली रतनगड आणि कटराबाई ही शिखरे तिच्या बहिणींच्या नावावरूनच ओळखली जातात.

three sisters | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

Chhatrapati Sambhajinagar | pinterest
येथे क्लिक करा...