Shreya Maskar
बनोटी धबधब्याला धारेश्वर धबधबा आणि पळशी म्हणूनही ओळखला जाते. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात हा धबधबा वसलेला आहे.
जंगली टेकड्यांमध्ये वसलेला धबधबा 200 फूट उंच आहे. पावसाळ्यात तुम्ही येथे फॅमिली ट्रिप प्लान करू शकता.
बनोटी धबधब्याजवळ प्राचीन बनोटी लेणी आहे. हे पर्यटनासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते.
बनोटी धबधब्याच्या परिसरात खडकात कोरलेला एक प्राचीन बौद्ध मठ दडलेला आहे. १,५०० वर्षे जुन्या बौद्ध मठाचे पडके खांब आहेत. हा मठ जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेण्यांच्या समकालीन मानला जातो.
बनोटी धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी जंगलातून ट्रेकिंग करावी लागते. पावसाळ्यात येथे दाट धुके पाहायला मिळते. तसेच इंद्रधनुष्याची छटाही दिसते.
बनोटी धबधब्याजवळ भगवान शिव आणि शनिदेव यांची मंदिरे देखील आहेत. येथे तुम्हाला शांत आणि मंगलमय वातावरण अनुभवता येईल.
बनोटी धबधब्याजवळ पाचोरा जंक्शन आणि चाळीसगाव रेल्वे स्थानक आहे. तुम्ही स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने बनोटी धबधब्यापर्यंत जाऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.