Shreya Maskar
गगनबावडा हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले हे ठिकाण हिरवाईने नटलेले घाट, किल्ले, धबधबे आणि वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पालसंबेपासून सुमारे २५ किमी अंतरावर नापणे धबधबा वसलेला आहे. दाट हिरवाईने वेढलेला हा धबधबा जवळपास वर्षभर वाहता असतो.
राधानगरी/गगनबावडाजवळ राऊतवाडी धबधबा आहे. पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी हे लोकेशन बेस्ट आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
कासारवाडी धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात पडळी गावात आहे. गर्दीपासून दूर आणि नैसर्गिक सौंदर्य जपलेला हा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय आहे.
भुदरगडजवळील जंगलाने वेढलेला गधाडी धबधबा परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करतो. पावसाळ्यात धबधब्याखाली ओले चिंब भिजायला येथे नक्की जा.
पालसंबेपासून सुमारे ५५ किमी अंतरावर सावडाव धबधबा आहे. ४० फूट उंचीवरून कोसळणारा प्रवाह, आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि पोहण्यासाठी अत्यंत सुरक्षित असलेले उथळ डोह येथे आहे.
उन्हवरे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले गरम पाण्याचे झरे आहे. पावसाळ्यात येथे अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.