Shreya Maskar
तुम्हाला पावसाळ्यात वीकेंडला वन डे ट्रिप प्लान करायची असेल तर पुणे बेस्ट आहे. पुण्यातील ताम्हिणी घाटला रोड ट्रिपचा आनंद घ्या.
ताम्हिणी घाट हा महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत, मुळशी आणि ताम्हिणी यांच्या दरम्यान स्थित असलेला एक घाटमार्ग आहे. पुण्यातील हे एक सुंदर ठिकाण आहे.
ताम्हिणी घाट हा पावसाळ्यातील विलोभनीय निसर्गदृश्ये, खळखळणारे धबधबे आणि पश्चिम घाटातून जाणाऱ्या निसर्गरम्य रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा घाटमार्ग महाराष्ट्रात मुळशी आणि ताम्हिणी या ठिकाणांच्या दरम्यान आहे.
पावसाळ्यात येथील कोरड्या टेकड्यांवर दाट हिरवळीची चादर पसरते आणि आकाशात खाली झुकलेले राखाडी ढग व धुक्याचे वातावरण असते.
रस्त्यावरूनच तुम्हाला अनेक लहान-मोठे धबधबे पाहता येतात. यामध्ये ताम्हिणी धबधबा आणि पालासे धबधबा यांचा समावेश आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
ताम्हिणी घाट हा ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. ताम्हिणी घाटातून जाताना हिरवेगार जंगल, खळाळणारे धबधबे पाहायला मिळते. सह्याद्रीच्या डोंगररांगा पावसाळ्यात अत्यंत मनमोहक आणि सुंदर दृश्य देतात.
खडकवासला धरण, मुळशी तलाव, पवना तलाव, सिंहगड किल्ला
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.