Pune : पुण्याजवळचा 'हा' छुपा स्वर्ग माहित आहे का? वीकेंडला आवर्जून भेट द्या, निसर्गाचं हे रूप कधी पाहिलं नसेल

Shreya Maskar

पुणे

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 'घोद' नदीवर डिंभे धरण वसलेले आहे.हे धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेल्या विस्तीर्ण आणि निळसर-हिरव्या जलाशयासाठी प्रसिद्ध आहे.

Pune | google

डिंभे धरण

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हे धरण आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याजवळील टेकड्यांवरून खाली उतरणारे ढग आणि दाट धुके एक आल्हाददायक आणि शांत वातावरण निर्माण करतात.

Dimbhe Dam | google

नयनरम्य जलाशय

डिंभे धरणाचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि निळे आहे. येथील हिरवीगार पर्वतरांगांची दृश्ये पावसाळी पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करतात. धुक्याने वेढलेल्या हिरव्यागार सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर चमकणारे निळसर-हिरवे जलाशय अतिशय सुंदर दिसते.

A picturesque reservoir | google

पावसाळा

मुसळधार पावसामुळे हा प्रचंड जलाशय पाण्याने भरून जातो. हिरव्यागार जंगलामुळे येथील पाण्याचा रंग तेजस्वी निळसर-हिरवा दिसतो, जो एक सुंदर विरोधाभास निर्माण करतो.

rainy season | pinterest

शांत वातावरण

गर्दीच्या पर्यटन स्थळांच्या तुलनेत डिंभे धरण हे शांत आणि निवांत ठिकाण आहे, जे निसर्गप्रेमी आणि 'रोड ट्रिप' करणाऱ्यांसाठी उत्तम आहे.

Calm atmosphere | google

हिरवागार निसर्ग

सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने हिरवा शालू पांघरल्या सारखे वाटते. डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे, धुक्याची चादर पाहून तुमचे मन वेडे होईल.

Green nature | google

कसं जायचे?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने गाडी चालवून तुम्ही डिंभे धरणापर्यंत पोहोचू शकता. यासाठी साधारणपणे ४.५ तास लागतात. येथे फॅमिलीसोबत रोड ट्रिप प्लान करा.

how to go | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Dam | google

NEXT : महाराष्ट्रातील 'ही' ५ शहरे सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध, इथे फिरला नाहीत तर काय मजा!

Maharashtra | AI PHOTO
येथे क्लिक करा...