Pune : पुण्याच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य ठिकाण! वीकेंडला चला फिरायला

Shreya Maskar

पुणे

महाराष्ट्रातील पुणे शहराच्या दक्षिण भागात, पर्वती टेकडीच्या जवळ तळजाई टेकडी/तळजाई हिल्स हे ठिकाण वसलेले आहे. रिमझिम पावसात हे ठिकाण स्वर्गाहून सुंदर दिसते.

Pune | google

तळजाई टेकडी

शहराच्या हद्दीतच वसलेले एक हिरवेगार वन-उद्यान आहे. पावसाळ्यात हे ठिकाण धुक्याने वेढलेले असते. येथे शुद्ध गार हवा अनुभवता येते.

Taljai Hill | google

वन्यजीव

तळजाई टेकडीला गेल्यावर प्रामुख्याने मोर पाहायला मिळतात. तळजाई टेकडी हे पुण्यातील एक संरक्षित वन्यजीव राखीव वनक्षेत्र म्हणून ओळखले जाते.

Wildlife | google

हिरवागार निसर्ग

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग-वाटांमधून चालण्याची मजाच काही वेगळी आहे. तुम्ही येथे भन्नाट फॅमिली ट्रिप प्लान करू शकता. राखीव वनक्षेत्राच्या आत मोटार-वाहनांना प्रवेश नाही. यामुळे शहराच्या रहदारीपासून दूर, स्वच्छ हवा आणि शांत व प्रसन्न वातावरण अनुभवता येते.

Green nature | google

आजूबाजूचा परिसर

तळजाई टेकडीवर 'श्री तळजाई माता देवस्थान' आहे. येथे शांत वातावरण अनुभवता येते. टेकडीच्या उंचावरील स्थानामुळे शहराचे विहंगम दृश्य दिसते. येथून हिरवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे ३६०-अंश दृश्य अनुभवता येते.

Surroundings | google

पक्षी निरीक्षण

येथील परिसरात मोर, ससे, बदके आणि विविध स्थलांतरित पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास आहे. ज्यामुळे पक्षीतज्ज्ञ आणि हौशी पक्षी निरीक्षकांसाठी हे एक आवडते ठिकाण बनले आहे.

Bird watching | google

ट्रेकिंगच्या वाटा

तळजाई टेकडीवर हिरवाईने नटलेले अनेक मार्ग आणि मातीच्या वाटा आहेत. स्थानिक नागरिक दररोज सकाळ-संध्याकाळची चाल, जॉगिंग आणि हलक्या स्वरूपाच्या ट्रेकिंगसाठी यांचा वापर करतात.

Trekking shares | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

konkan Beach | AI PHOTO
येथे क्लिक करा...