Pune Waterfall : वीकेंडला पुण्याला जाताय? मग 'हा' निसर्गरम्य धबधबा पाहायला विसरू नका

Shreya Maskar

पुणे

पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथील रामनगर भागात शिवापूर धबधबा वसलेला आहे. हे ठिकाण पुणे स्टेशनपासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर आहे.

Pune | google

शिवापूर धबधबा

पावसाळ्यात वीकेंडला पुण्यात असाल तर शिवापूर धबधब्याला नक्की भेट द्या. हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील खूपच सुंदर आहे.

Shivapur Falls | google

निसर्ग सौंदर्य

शिवापूर धबधब्याला गेल्यावर आल्हाददायक वातावरण, दाट धुके, शांत-हिरवागार निसर्ग पाहायला मळतो. हा धबधबा स्थानिक लोकांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे.

Beauty of nature | google

कधी भेट द्यावी?

शिवापूर धबधब्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्की भेट द्या. येथे परदेशी पर्यटकही येतात. पुण्यात अनेक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

When to visit? | google

मंदिर

शिवापूर धबधब्याजवळ भगवान शिवाचे ऐतिहासिक आणि पवित्र मंदिर आहे. हे शांत वातावरण, दाट हिरवाई आणि तेथील ओढा/धबधब्याच्या परिसरासाठी प्रसिद्ध आहे.

Temple | google

देवकुंड धबधबा

खडकाळ कडे आणि घनदाट जंगलांनी देवकुंड धबधबा वेढलेला आहे. एक खोल, फिरोजी रंगाचा डोह येथे आहे.

Devkund Falls | google

कुणे धबधबा

६६० फूट उंचीचा हा भारतातील १४ वा सर्वात उंच धबधबा आहे. येथे तीन टप्प्यांत भव्य धबधबा कोसळतो, रस्त्याने सहज पोहोचता येते आणि कोणत्याही अवघड ट्रेकिंगची आवश्यकता नाही.

Kune Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पालघरपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' मनमोहक धबधबा, वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट!

Palghar Waterfall | AI PHOTO
येथे क्लिक करा...