Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

Shreya Maskar

पुणे

मोराची चिंचोली हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेले प्रसिद्ध कृषी पर्यटन गाव आहे. पुण्यापासून साधारण 55–60 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण विशेषतः मोरांचे मुक्त संचार, ग्रामीण जीवन, शेतभेटी आणि पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती यासाठी ओळखले जाते.

Pune | google

मोराची चिंचोली

गावाच्या परिसरात मोर मुक्तपणे फिरताना पाहायला मिळतात. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी मोर पाहण्याचा अनुभव अधिक सुंदर ठरतो. त्यामुळे हे ठिकाण पक्षीनिरीक्षण आणि निसर्गप्रेमींसाठी खास आहे.

Peacock Chincholi | google

कृषी पर्यटनाचा अनुभव

शहरातील धावपळ सोडून शेतातील वातावरण अनुभवता येते. शेती, गावातील दैनंदिन जीवन आणि पारंपरिक पद्धती जवळून पाहण्याची संधी मिळते. ग्रामीण महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेली बैलगाडी सफर येथे पर्यटकांसाठी आकर्षण ठरते.

Peacock Lifespan | pinterest

शेती

शेतातून ट्रॅक्टरने फेरफटका मारण्याचा अनुभवही घेता येतो. लहान मुलांसाठी ही राईड विशेष मनोरंजक ठरू शकते. हिवाळ्यातील खास आकर्षण म्हणजे हुर्डा पार्टी होय.

agriculture | pinterest

ग्रामीण जेवण

मोराची चिंचोलीला भेट दिल्यावर पारंपरिक पद्धतीचे भाकरी, पिठलं, ठेचा, वरण-भात, पुरणपोळी यांसारखे पदार्थ चाखण्याचा अनुभव घेता येतो. येथे चुलीवरचे जेवणही दिले जाते.

Rural food | pinterest

कॅम्पिंग

काही ठिकाणी रात्री बोनफायर, कॅम्पिंगची सोय उपलब्ध आहे. काही कृषी पर्यटन केंद्रांमध्ये स्विमिंग पूल, वॉटर पार्क आणि रेन डान्सची सुविधाही आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कुटुंब आणि मुलांसाठी हे आकर्षण ठरते.

camping | pinterest

अ‍ॅक्टिव्हिटीज

परिसरातील विविध कृषी पर्यटन केंद्रांमध्ये झिपलाइन, आर्चरी, सायकल रोपवे, रेन डान्स, मिनी ट्रेन, ट्रॅम्पोलिन, रोप अ‍ॅक्टिव्हिटीज अशा मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध असू शकतात. हिरवीगार शेती, चिंचेची झाडे, मोकळे शेत आणि मोरांचे दर्शन यामुळे निसर्ग फोटोग्राफीसाठी मोराची चिंचोली चांगला पर्याय आहे.

activities | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Picnic Spot | yandex

NEXT : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

Matheran | AI PHOTO
येथे क्लिक करा...