ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात मावळ, खेड, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि वेल्हे यासारख्या भागात पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. याच पार्श्वभूमीवर, पुणे वन विभागाने पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सावधगिरी बाळगण्याचे आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
भुशी धरण, ताम्हिणी घाट, पावना धरण आणि शिवनेरी किल्ला यासारख्या लोकप्रिय ठिकाणी पावसाळ्यात मोठी गर्दी होते यासाठी पुणे वनविभागाने काही मार्गदशर्क तत्वे जारी केली आहेत.
गेल्या वर्षी लोणावळा येथील भूशी डॅमजवळ झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच सदस्यांच्या मृत्यूसह झालेल्या दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे.
पर्यटकांना वन्य प्राण्यांना खाऊ घालू नये तसेच त्यांच्या जवळ जाऊ नये.
ट्रेकिंगला जाताना किंवा फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी कचरा जंगलात न फेकता सोबत घेऊन जावे.
ट्रेकर्सने चिन्हाकिंत म्हणजेच ठरवलेल्या मार्गांवर चालावे. धोकादायक रस्त्यांचा वापर करु नये. तसेच पावसाशी संबधित साहित्य सोबत ठेवण्याचे, आणि अचानक हवामानातील बदलांसाठी तयार रहावे.
धोकादायक स्पॉट्सवर सेल्फी काढणे किंवा रिल्स शूट करणे टाळा.
उपवनसरंक्षक तुषार चव्हाण म्हणाले, पुण्याची जैवविविधतेचे रक्षण करणे हे केवळ अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही, तर जंगलात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे कर्तव्य आहे.