Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही पुण्याजवळील भीमाशंकरचा 1 Day Trip प्लॅन करू शकता.
भीमाशंकर मंदिर आणि त्याजवळचे सुंदर दृश्य पावसाळ्यात अगदी सुंदर असते.
भीमाशंकरजवळ तुम्ही मंदिर, जंगल, आणि ट्रेकचा अनुभव घेऊ शकता.
भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्ही पुण्याहून चाकण, राजगुरुनगर, वाडा आणि भीमाशंकर असा प्रवास करावा.
पुण्याहून भीमाशंकरचे अंतर एकूण ११० किमी आहे. म्हणजेच तुम्हाला ३.५ तास लागू शकतात.
तुम्हाला भीमाशंकरचा संपुर्ण परिसर पाहायचा असेल तर सकाळी पहाटेच्या वेळेस निघा.
भीमाशंकरजवळ तुम्हाला घरगुती जेवण त्यामध्ये पिठलं भाकरी, वरण भात ठेचा असे पदार्थ आणि नाश्त्याचे पदार्थ मिळतील.
तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल आणि वेळ होणार असेल तर गावकऱ्यांकडून तुम्हाला होमस्टेच्या सुविधा मिळू शकतात.