ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, स्नायू तयार करण्यासाठी, आणि उर्जेसाठी प्रोटीनची आवश्यकता असते.
अंडी, पनीर आणि सोयाबीनपेक्षाही जास्त प्रोटीन या एका सूपरफूडमध्ये आहे, जाणून घ्या.
भोपळ्याच्या बियांना प्रोटीनचे पावरहाउस म्हटले जाते. निरोगी आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर मानले जातात.
१०० ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये ३२ ग्रॅम प्रोटीन असते. स्नायू तयार करण्यासाठी आणि शरीराल उर्जा प्रदान करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
यामध्ये, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जे हाडांच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
तुम्ही या बिया सॅलड, स्मूदी किंवा दहीमध्ये मिक्स करुन खाऊ शकता.
दररोज मर्यादित प्रमाणात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.