Shraddha Thik
काही व्यक्ती दिवसातून 10 वेळा खोटं बोलतात. त्यांना खोटं बोलण्याची सवयच लागलेली असते.
सायकोलॉजीनुसार, काही व्यक्ती स्वत:वर येणाऱ्या संकटांपासून बचावासाठी खोटं बोलण्याचा मार्ग अवलंबतात.
एखाद्या व्यक्तीचे चांगले होत असेल तेव्हा काहीजण खोटं बोलतात.
काही व्यक्ती आपली छाप इतरांवर पाडू इच्छितात आणि त्यामुळे ते इतरांच्या नजरेत येण्यासाठी खोटं बोलतात.
जे व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी तयार होत नाहीत तेव्हा त्यांना ती गोष्ट पटवून देण्यासाठी काहीजण खोटं बोलतात.
काही लोक आपल्या आयुष्यात इतके खोटं बोलतात की त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी खोटं बोलण्याची एक प्रकारे सवयच लागते.
अनेक अभ्यासात असे समोर आले आहे की, काही लोक आपले मित्र, नातेवाईक, बॉस यांच्यासोबत असे काम करतात की त्यांना खोट बोलल्याशिवाय जमतच नाही.