Shraddha Thik
वादग्रस्त भांडणांमध्ये, संयम राखा आणि समोरच्या व्यक्तिच्या दृष्टीकोनातून लक्षपूर्वक ऐकायला शिका.
भांडणाच्या वेळी तुमची मते सकारात्मक मांडण्याची पद्धत ठेवा आणि शक्य असल्यास चुकीचे तसेच अपशब्द वापरू नका. आपले मत फॅक्ट्ससह ठेवण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला वक्ता व्हायचे असेल तर तुम्ही चांगले श्रोता असणे आवश्यक आहे. म्हणून, भांडणाच्या दरम्यान, आपण प्रथम समोरच्या व्यक्तीचे ऐकले पाहिजे आणि नंतर विराम दिल्यानंतर आपले मत मांडले पाहिजे.
मानसशास्त्रात असे सांगितले जाते की, जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या वृत्तीमुळे राग आला तर तुम्ही त्याला उघडपणे विचारू शकता की त्याची समस्या काय आहे? जेणेकरुन तो आपल्या भावना तुमच्या समोर उघडपणे मांडू शकेल.
अनेकदा वादाच्या वेळी लोक एकमेकांना दोष देऊ लागतात. असे केल्याने प्रकरण चिघळते. त्यामुळे तुम्ही ब्लेम गेम खेळ खेळू नये.
भांडणाच्या वेळी, समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीमध्ये फरक असतो. अशा स्थितीत तुम्ही त्यांचे भाव समजून घ्या आणि त्यानुसार अभिव्यक्त व्हा.
अनेकवेळा वाद सुरू असताना आरडाओरडा सुरू होतो, अशा स्थितीत वादाचे रुपांतर हाणामारीत होते. त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज नेहमी सामान्य ठेवावा.